" कायाशुद्धी पर्याप्त नाही "
एकदा तथागत श्रावस्ती येथे वास्तव्याला होते . त्याचवेळी संगारव नावाचा ब्राम्हणहि तेथे राहत होता. तो जलशुद्धीप्रती श्रद्धावान होता. तो जलशुद्धीचे आचरण करणारा होता. रात्रंदिन प्राय स्नान करणे हीच त्याची प्रकृती आणि प्रवृत्ती होती.
एके दिवशी सकाळी स्थविर आनंद चीवर धारण करून आणि पात्र घेऊन श्रावस्ती नगरीत चारीकेस्तव प्रस्थान करीत असता . श्रावस्ती नगरीत फिरून भिक्षा प्राप्त केली . अन्न ग्रहण केले आणि परत येताना तो तथागतांकडे गेला . त्याने तथागतांना वंदन केले व बाजूला आसनस्थ झाला . आणि तथागतांना सांगू लागला कि, या श्रावस्ती नगरीत संगारव नावाचा ब्राम्हण आहे तो जलशुद्धीप्रती श्रद्धावान आहे. तो स्नानादींच्या माध्यमातून निरंतर जलशुद्धी प्रक्रियेत मग्न असतो. तो रात्रंदिन स्नान आणि शुद्धी यातच रममाण असतो. हे तथागता , आपण त्या ब्राम्हणावर अनुकंपा करावी आणि त्या ब्राम्हणाची एकदा भेट घ्यावी .
तथागतांनी मौन राहूनच समंती दर्शविली . दुसऱ्या दिवशी तथागत पहाटेच संगारावाच्या निवासस्थानी गेले. तेथे गेल्यावर प्रस्तुत आसनावर तथागत आसनस्थ झाले.
त्यानंतर संगारव ब्राम्हण तथागतांकडे आला . त्याने तथागतांना वंदन केले. व तथागतांच्या निकट तो आसनस्थ झाला. त्यानंतर तथागत त्याला म्हणाले , तू जलशुद्धीवर श्रद्धा करतो, तू स्नानादि करून कायाशुद्धी करतोस . तू रात्रंदिन स्नानाशुद्धीत मग्न असतोस असे लोक म्हणतात. हे सत्य आहे काय ?
त्यावर तो ब्राम्हण म्हणाला " हे श्रमण गौतमा हे सत्य आहे "
" तथागत त्याला म्हणाले " हे ब्राम्हण , रात्रंदिन अशी स्नानशुद्धी करून तुला कोणता लाभ होईल असे तुला वाटते " ?
तो ब्राम्हण म्हणाला " श्रमण गौतमा , त्याचे असे आहे . मी दिवसभरात जे पापकर्म करतो ते मी सांयसमयी स्नान करून धुवून टाकतो . आणि रात्री मी जे काही पापकर्म करतो ते दुसऱ्या दिवशी प्रातासमयी स्नान करून ती धुवून टाकतो . स्नानादींच्या शुद्धी करण्यात हाच लाभ मी पाहतो . हाच लाभ मला दिसतो ."
त्यावर तथागत त्याला म्हणाले , " धम्म हेच जलाशय होय. हे जलाशय स्वच्छ आहे निर्मल आहे ."
" शास्त्रांचे ज्ञाता जे जलाशयात स्नान करतात त्यांचे प्रत्येक अंग शुद्ध होते आणि ते पैलतीरी
जातात ." यावर ब्राम्हण संगारव तथागतांना म्हणाला , " श्रमण गौतमा , हे अद्भुत आहे श्रमण गौतमाने अनुगामी म्हणून माझा स्विकार करावा . या क्षणापासून जीवनपर्यंत तथागताने मला आपला शरणागत आणि उपासक करून घ्यावे . "
!!! साधू ................साधू..................साधू..............!!!
! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!

No comments:
Post a Comment