Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Memories of Another day

Memories of Another day
While my Parents Pulin babu and Basanti devi were living

Sunday, February 17, 2013

आंबेडकर हे दलित वडिलांचे पूत्र नसून, महाराष्ट्रामधील एका सवर्ण राजाचे अनधिकृत पूत्र आहेत ?

आंबेडकर हे दलित वडिलांचे पूत्र नसून, महाराष्ट्रामधील एका सवर्ण राजाचे अनधिकृत पूत्र आहेत ?

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाला इंदू मिलची जमीन केंद्र व महाराष्ट्र राज्य सरकारने देण्याचे घोषित केल्याने अरविंद केजरीवाल यांच्या समर्थकांमध्ये पोटदुखी सुरु झाली असून नागपूर, गोपाल नगर येथील एस.बी.आय. वसाहत येथे राहणाऱ्या धरमदास रामाणी यांनी आंबेडकर, आंबेडकरी जनता व नेत्यांबाद्द्दल अत्यंत तुच्छ भाषा वापरत पत्रव्यवहार करून इंदू मिलची जमीन देवू नये अशी मागणी केली आहे. alt
धरमदास रामाणी यांनी राष्ट्रपती, प्रधानमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना दिनांक ८ डिसेंबर २०१२ रोजी लिहिलेले पत्र आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या हाती लागले असून हे पत्र रजिस्टर ए.डी. किवा स्पीड पोस्टने पाठवल्याच्या पावत्या या पत्रावर आहेत. या पत्रामध्ये संविधानिक राष्ट्रपती व प्रधानमंत्री या पदापेक्षा अरविंद केजरीवाल यांना मोठे महत्व देण्यात आले आहे.रामाणी यांनी पाठवलेल्या पत्रात निळ्या झेंडे वाल्यांना जनतेच्या व सरकारच्या जमिनी फुकट लाटण्याच्या सवयी झाल्या आहेत. त्यांच्या मध्ये आत्मसन्मान कधीच नव्हता त्यांना लाजही वाटत नाही. निळ्या झेंडे वाल्यांना काहीही दिल्या नंतर ते गद्दारी करतात. फुकट मध्ये भेटलेल्या इंदू मिलच्या जागेचा वापर सरकार विरोधी कारवायांसाठी केला जाईल असे लिहिले आहे.
निळे झेंडे वाले ज्या आंबेडकरांचे नाव घेवून काहीही करतात त्या आंबेडकरांनी भारत स्वतंत्र होताना गांधीना त्रास देण्याचे काम केले. जेव्हा सर्व लोक स्वतंत्रता युद्ध लढत होते तेव्हा आंबेडकर दलितांच्या नावाने ब्रिटीशाना फूट पाडण्यासाठी साथ देवून वेगळे मतदार संघ मागत होते. म्हणूनच आंबेडकरांना ब्रिटीशानी कम्युनल अवार्ड देवून सन्मानित केले असे पत्रात लिहिले आहे.सायमन कमिशनला विरोध केला जात असताना मुंबई प्रेसिडन्सी कमिटी मध्ये डॉ. आंबेडकर एकमेव भारतीय होते हा त्यांच्या दगाबाजीचाच पुरावा आहे. पूणे करार करताना मोहन मालवीय व पवलकर बाळू यांनी आंबेडकर हे दलित वडिलांचे पूत्र नसून, महाराष्ट्रामधील एका सवर्ण राजाचे अनधिकृत पूत्र आहेत हे गांधीना खरे सांगून दलित आंदोलनाचा भांड फोड करू अशी धमकी दिल्यानेच आंबेडकर पूणे करार करण्यास तयार झाले असे पत्रात म्हटले आहे.
बुद्ध विहारे आणि आंबेडकर भवन हे दारू पिण्याचे, अवैध दारू विकण्याचे, जुगाराचे अड्डे बनले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले साहित्य हे त्यांचे स्वतःचे नसून इकडून तिकडून चोरी करून लिहिलेले साहित्य असल्याचे रामाणी यांनी पत्रात लिहिले आहे. या सर्व प्रकारामुळे आंबेडकरी जनतेला इंदू मिलची जमीन देवी नये अशी मागणी रामाणी यांनी केली आहे.दरम्यान अरविंद केजरीवाल, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात रामाणी यांनी वापरलेली भाषा अत्यंत खालच्या दर्जाची असल्याने व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात खालच्या दर्जाची भाषा वापरल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. तसेच रामाणी यांनी लिहिलेल्या पत्रात भारतीय संविधान निर्मात्याच्या विरोधात खालच्या दर्जाची भाषा वापरल्याने केंद्र व राज्य सरकारने याबाबत रामाणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून रामाणी यांच्यावर कायदेशीर कारवाही करावी अशी मागणी करणार असल्याचे रिपाई आठवले गटाचे युवा नेते दिलीप गायकवाड यांनी सांगितले आहे.
---------------

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...