सांगा मी कोण?
मी भगवान आहे
पण देव नाही.
मी गुडमॉन आहे
पण Godman नाही.
मी मंकी God आहे
पण पौराणिक नाही.
मी पूजनीय आहे
मात्र अर्चनीय नाही.
मी अष्टविनायक आहे
पण सिद्धिविनायक नाही.
मी जगननाथ असूनही
पुरीच्या मंदिरात नाही.
मी थेर - पती असूनही
तिरु -पती च्या मंदिरात नाही.
मी अंजनीसुत असूनही
सूर्य धरण्याचा आग्रह केला नाही.
मी मारुती होतो
पण माकड नाही.
मी वायुपुत्र होतो
पण पर्वत उचलले नाही.
मी ब्रह्मांड धर्म ज्ञाता असूनही
ब्राम्हण वर्णीय नाही.
मी दु:ख हर्ता असूनही
इच्छापूर्तीचा मार्ग सांगितला नाही.
मी सुगतीचा पथदर्शक आहे
पण स्वर्गाचा रस्ता दाखवला नाही.
मी वंदनीय असूनही.
व्यक्तिपूजेचा मार्ग सांगितला नाही.
मी शिंह नाद केला
पण शंखनाद केला नाही.
मी मौर्य राजाला प्रिय होवूनही
'बाप्पा मोरया'नाही .
मी पुंडरीक असूनही
वर्दे विठ्ठल नाही.
मी धर्मचक्र फिरवले
पण सुदर्शन चक्र नाही.
मी अधर्मावर वार करूनही
वारकरी नाही.
मी दश-बली असूनही
दहा तोंड्या रावण नाही.
मी अष्टचक्र दिले
पण अष्टांग योगी नाही.
मी पितांबर होतो
पण दिगंबर नाही .
मी उपोसथ सांगितले
पण उपवासाचे महिमामंडन नाही.
वैचारिक क्रांती केली
पण भ्रांती पसरवली नाही.
शाक्यशिंह असूनही
छत्रीयत्वचा दंभ बाळगला नाही.
राजा असूनही
रंक असण्याचे गुणगान केले नाही.
सांगा मी कोण? सिरीमान V अनाव्रत.
साभार, सदधर्म सभ्यता संघाचे मुखपत्र सदधर्म संदेश मासिक सप्टे २ ० १ ३.
No comments:
Post a Comment